Spread the love

पदवी पूर्व शिक्षण खात्याच्या वतीने राज्य स्तरीय स्केटींग स्पर्धेचे आयोजन
सालाबादप्रमाणे या वर्षी ही विविध क्रिडा महोत्सवाचे आयोजन पदवी पूर्व शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आले,यात या वर्षीचे विशेष आकर्षण स्केटींग स्पर्धेचे आयोजन एस के ई सोसाइटी च्या जी एस एस पी यु काॅलेज द्वारे शिवगंगा स्पोर्टस् क्लबच्या स्केटींग मैदानावर आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेसाठी 13 विद्यार्थी संघ 13 जिल्ह्यामधून आणि 10 विद्यार्थीनी संघ 10 जिल्हामधून सहभागी झाले.
प्रथम दर्शनी आज रोजी सकाळी 6 वाजता स्पर्धेचा उदघाटन आणि स्पर्धा दोहोची सुरवात करण्यात आली,
सकाळच्या या सत्रास बेळगावचे डी डी पी यु श्री एम एम कांबळे, जी एस एस पी यु काॅलेजचे प्राचार्य एस एन देसाई ,विविध काॅलेजचे प्राचार्य आणि क्रिडाशिक्षक, शिवगंगा स्पोर्टस् क्लबचे पदाधिकारी व कोच उपस्थित होते. या वेळी स्पर्धकांनी उत्सकृत प्रतिसाद दिला. 23 जिल्हातील स्पर्धक आणि प्रशिक्षक या स्पर्धेचे साक्ष ठरले.
शिवगंगा स्केटींग मैदानावर 10 वाजता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात ही चांगला प्रतिसाद दिला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा शिवगंगा स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर आयोजित करण्यात आला.
या वेळी मंचावर डी डी पी यु श्री एम एम कांबळे,प्रमुख पाहुणे श्री प्रसाद तेंडुलकर,, प्रशिक्षक, पंच,(रेफरी ), प्राचार्य उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कुमारी अर्पिता समूहाच्या स्वागत गीता व्दारे करण्यात आली, सूत्रसंचालन प्रा डाॅ किर्ती फडके आणि प्रा सविता कुलकर्णी यांच्या समूहाने केले.
डी डी पी यु श्री एम एम कांबळे यांचे स्वागत प्राचार्य एस एन देसाई यांनी केले, श्री प्रसाद तेंडुलकर, श्री गोपाळकृष्ण एम आर ,जी एन पाटील,श्री प्रभू शिवनायकर,श्री एन बी शिरशाड,श्रीमती सुधाबाबू,श्री नागराज मरेनावर,श्री बंजत्री, श्री सूर्यकांत हिडलगेकर उपस्थित होते.
मंचावरून उपस्थितांना उपदेषून श्री एम एम कांबळे, श्री प्रसाद तेंडुलकर, श्रीमती सुध्दाबाबू यांनी आपले विचार मांडले.
स्केटींग स्पर्धेमध्ये रोड रेस,ईनलाईन,काॅड,500 मीटर,1000मीटर आशा विविध स्पर्धेचे आयोजन मुल आणि मुली या दोहोसाठी आयोजित करण्यात आल्या यातून राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली या मध्ये मुलांच्या इनलाईन स्पर्धेमध्ये मंगलोरचा कुमार तन्मय एम कोठारे, कुमार हर्षीत बी टी मैसूर,कुमार वैष्णव एम उपाध्ये यांची निवड झाली, काॅड स्पर्धेत कुमार अक्षय के,कुमार विवेन जैन बेंगलोर साऊथ,कुमार निर्मय वाय एन मेंगलोर यांची निवड झाली
मुलींच्या इनलाईन स्पर्धेत कुमारी वर्षीनी अपर्णा बेंगलोर नाॅर्थ, प्रतिक्षा के एस मैसूर,कुमारी एस प्रेरणा गणेश बेंगलोर नाॅर्थ यांची निवड झाली, मुलींच्या काॅड स्पर्धेत कुमारी सौजन्या शेषगीरी धारवाड, कुमारी बिंदु बी एम बेंगलोर नाॅर्थ, कुमारी ऐश्वर्या एन बेंगलोर नाॅर्थ यांची निवड झाली.
स्पर्धेचे सर्वसाधारण विजेते पद मुलांच्या बेंगलोर नाॅर्थ आणि मुलींच्या बेंगलोर साऊथ ला देण्यात आले.