
⭐ “मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या तीन महत्त्वाकांक्षी योजनांचा भव्य लोकार्पण सोहळा; मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ”
थोडक्यात न्यूज :
बेंगळुरू येथे अरमाने मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमात महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या तीन महत्त्वाकांक्षी योजनांचे मुख्यमंत्री सिद्दरामैया व उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ‘अक्कापडे’ महिला सुरक्षा योजनेसोबतच ‘गृहलक्ष्मी विविधोद्देश सहकारी संस्था’ तसेच राज्यातील 5,000 अंगणवाडी केंद्रांमध्ये एलकेजी–यूकेजी वर्गांची सुरुवात करण्यात आली.
या ऐतिहासिक सोहळ्यास 50 हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती होती. मंत्री हेब्बाळकर यांनी आईसीडीएस योजनेच्या सुवर्णमहोत्सानिमित्त त्यामध्ये आणखी सुधारणा करण्याचा संकल्प व्यक्त केला. अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मानधन वाढवण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
कार्यक्रमात राज्यस्तरीय बालकल्याण, वरिष्ठ नागरिक सन्मान व उत्कृष्ट अंगणवाडी कार्यकर्त्या–सहायिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
