Spread the love

बेळगावातील किणये गावात बांधकामाधीन असलेल्या श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिराच्या इमारतीचा ‘कॉलम पूजन’ सोहळा युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते स्थानिक जनप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला. सुमारे ६५ लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येत असलेल्या या मंदिराचे काम ग्रामस्थांच्या सूचनांचा आदर ठेवून सुशोभित पद्धतीने पूर्ण करावे, अशी सूचना त्यांनी ठेकेदारांना दिली.

कार्यक्रमाला मारुती डुकरे, सुबाष डुकरे, कृष्णा पाटील, अजित डुकरे, रवी डुकरे, महादेव बिरजे, देवेंद्र डुकरे, पुन्नप्पा दलवी, पुंडलिक दलवी, तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष हेमंत पाटील, सदस्य वर्षा डुकरे, संतू पाटील यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  1. किणयेतील विठ्ठल–रुक्मिणी मंदिर कॉलम पूजन; मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते शुभारं