Spread the love

जी एस एस पी यु काॅलेजमध्ये रिजाॅनन्स(अनुनाद)संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन

सालाबादप्रमाणे या वर्षी ही जी एस एस पी यु काॅलेजतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी विज्ञान, कला,संगणक, चित्रकला,फोटोग्राफी,चित्रफित,मुखवटे रंगविणे,बौध्दिक क्षमता,व्यवहार ज्ञान,भौतिकशास्त्र, जीवशास्त्र,रसायनशास्त्र, गणित विषयाशी निगडीत स्पर्धा, विधुत वस्तूचा उपयोग करून नवीन उपयोगी वस्तूंचा निर्माण, जुन्या सामग्रीतून नवीन उपयोगी वस्तूंचा निर्माण,आशा अनेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव शहरातील अनेक नामांकित शाळेच्या विद्यार्थी वर्गाने यात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या उद्दघाटन सोहळ्यास एस के ई सोसाइटीच्या जी एस एस पी यु काॅलेज आणि बी सी ए च्या मॅनेजमेंट कमिटीचे व्हाईस चेअरमन श्री संदीप तेंडुलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंचावर प्राचार्य एस एन देसाई,विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा अनिल खाण्डेकर, विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कुमारी प्रथा या विद्यार्थी नीच्या स्वागत गीता व्दारे करण्यात आली, पाहुणे मंडळी, शालेय संघाचे स्पर्धक,संघ प्रमुख, प्राध्यापक वर्ग यांचे स्वागत प्राचार्य एस एन देसाई यांनी केले.
विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा अनिल खाण्डेकर यांनी स्पर्धकांचे स्वागत करीत दोन दिवस चालणाय्रा स्पर्धेचे नियम आणि आटींची सविस्तर माहिती दिली,
श्री संदीप तेंडुलकर यांनी आशा कार्यक्रमाचे आयोजन हे भावी विद्यार्थी निर्माण करण्यात मोलाचे योगदान देते,तसेच अभ्यासाची निगडीत स्पर्धा ही त्यांची कलाकौशल्याचा विकास करण्यास प्रेरणादायी ठरते,पाहुण्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले आणि स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा देत रिजाॅनन्स या दोन दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली याची घोषणा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डाॅ किर्ती फडके आणि विद्यार्थी वर्गाने केले