Spread the love
  • जी एस एस पी यु काॅलेजच्या बहुभाषा विभागाच्या शब्दधारा संघाचा पारितोषिक वितरण सोहळा.

    बहुभाषा विभागाच्या शब्दधारा या संस्कृतीक संघाद्वारे वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ,या मध्ये काव्य वाचन,कथा सांगणे,निबंध,चित्रकला,रांगोळी, श्लोक पठण,वचन प्रस्तुतिकरण,प्रश्न मंजुषा, वादविवाद,व्यसनमुक्ती, आशा अनेक विषयावर इंग्रजी, हिन्दी, कन्नड,मराठी आणि संस्कृत भाषेमध्ये आयोजन करण्यात आले, या स्पर्धांना विद्यार्थी स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
    शंभर पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
    या स्पर्धेतील विजेता स्पर्धाकासाठी विभागद्वारे पारितोषिक वितरण सोहळा आज आयोजित करण्यात आला.
    या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्यंगचित्रकार आणि लोकमान्य ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री जगदीश कुंट्टे,विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.अनिल खाण्डेकर, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा सी बी ढवळे, भाषा विभाग प्रमुख प्रा. उमा भोजे, शब्द धारा संघाच्या अध्यक्षा प्रा. अनघा वैध, मंचावर उपस्थित होते.
    उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
    अध्यक्षीय भाषणात श्री जगदीश कुंट्टे यांनी सर्व स्पर्धेकांचे अभिनंदन केले तसेच आशा कार्यक्रमाचे आयोजन हे भावी विद्यार्थी वर्गासाठी आवश्यक असे उद्गार व्यक्त केले.
    अध्यक्ष प्रा अनिल खाण्डेकर यांनी भाषा विभागद्वारे आयोजित बृहत् स्पर्धा कार्यक्रमाचे अभिनंदन करीत भाविभविष्य साठी शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रमाची सुरुवात संस्कृत प्राध्यापक औध्दूत जोशी यांच्या श्लोक पठणाद्वारे झाली, उपस्थित मान्यवर,विद्यार्थी स्पर्धक,प्राध्यापक वर्गाचे स्वागत प्रा.उमा भोजे यांनी केले, प्रा अनघा वैध यांनी पाहुण्यांचा परिचय दिला,प्रा रेश्मा सपले यांनी शब्द धारा संघाचा वार्षिक अहवाल सादर केला,
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्वेता,कुमारी नम्रता, कुमारी पूर्वी, कुमारी तन्नवी या विद्यार्थीनीने प्रा प्रज्ञा बांदवडेकर आणि प्रा जयश्री कनगुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
    पारितोषिक वितरणचे कार्य प्रा शुभागी मुरकुटे, प्रा रेश्मा सपले,प्रा हेमलता पुजारी यांनी पाहिले,
    कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रा डाॅ अजीत कोळी यांनी केले.