Spread the love

बेळगाव (टिळकवाडी):
मिलेनियम गार्डनसमोर गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास असलेला अज्ञात वृद्ध गुरुवारी सकाळी मृत अवस्थेत आढळून आला. स्थानिकांच्या मते, थंडीचा तीव्र परिणाम व वृद्धापकाळ हे मृत्यूचे संभाव्य कारण असावे.
घटनेची माहिती मिळताच माजी महापौर विजय मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शववाहिकेची व्यवस्था करून मृतदेह सन्मानपूर्वक सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्याची कार्यवाही केली.
टिळकवाडी पोलीस ठाण्याचे CPI पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांच्या सहकार्याने मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवविच्छेदन कक्षात हलवण्यात आला.
या तत्परतेमुळे मृत व्यक्तीचा सन्मान राखला गेला आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया वेळेत पार पडल्या.