Spread the love
  1. माणूस म्हणून जगताना सर्वांवर प्रेम करणे आणि अन्य जातीतील लोकांनाही सन्मान देणे हेच बसव तत्त्वाचे खरे सार आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. बेळगाव तालुक्यातील अरळीकट्टी गावात आयोजित ‘अरळीकट्टी संभारंभ’ आणि श्री उळवी चन्नबसवेश्वर जीवनदर्शन प्रवचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
    बसव परंपरा, भारतीय संस्कृती व स्वामीजींच्या त्यागामुळेच आपली संस्कृती जगभरात गौरवली जाते, असे सांगत मंत्री हेब्बाळकर यांनी स्वामीजींच्या मातांच्या त्यागालाच सर्वोच्च बलिदान असे संबोधले. आजच्या पिढीपर्यंत पुराण, परंपरा व मूल्ये पोहोचवण्याची जबाबदारी आपली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    अरळीकट्टी गावात उभारण्यात येणाऱ्या बसव मंदिरासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, रस्ते, शाळा खोल्या व पुलांच्या बांधकामासाठीही निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
    गृहलक्ष्मी योजनेमुळे १.२४ कोटी महिलांना थेट लाभ मिळत असून, दरमहा मिळणारे २,००० रुपये महिलांसाठी मोठा आधार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
    याचवेळी अरळीकट्टी गावात २५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे तसेच नवीन बस स्थानकाचे उद्घाटन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. हे भवन सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.