बालवीर विद्यानिकेतनच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न

शिवसेना नेते मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती
बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. प्रेमानंद बाळू गुरव यांच्या अध्यक्षतेखाली बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेच्या 12 व्या स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा योगतज्ञ सौ अपर्णा गोजगेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या नूतन इमारतीमध्ये ‘श्री एच.डी. काटवा’ या वर्गखोलीचे उद्घाटन मा.श्री दीपक काटवा व विलास काटवा परिवार बेळगाव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. काटवा परिवार केशव सिमेंट यांनी आपल्या सी.एस.आर फंडातून नऊ लाखाचा निधी शाळेला उपलब्ध करून दिला. तर ‘महाराष्ट्र शासन’ या वर्ग खोलीचे उद्घाटन सन्माननीय मंगेश चिवटे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या इमारतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून गतवर्षी दहा लाख रुपयांचा निधी मिळाला होता. ‘स्वर्गीय सुरेखा गुरुनाथ गोजगेकर’ या वर्गखोलीचे उद्घाटन सौ.अपर्णा दीपक गोजगेकर यांच्या शुभहस्ते झाले. बेळगावचे प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर मा.दीपक गोजगेकर, यांनी स्वखर्चातून बांधून दिलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन शाळेचे संयोजक शंकर चौगुले यांच्या शुभहस्ते झाले.तसेच बेळगाव जी.एस.टी.विभागाचे अप्पर आयुक्त मा.श्री.आकाश शंकर चौगुले यांनी स्वखर्चातून ‘उमा शंकर’ या नावाने सुसज्ज असे वाचनालय व अभ्यासिका वर्ग उपलब्ध करून दिले. त्याचे उद्घाटन सुभाष फोटो ग्रुपचे संचालक सुभाष ओऊळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. इमारतीच्या पूर्णत्वासाठी प्रेमानंद बाळू गुरव संपूर्ण इमारतीसाठी लागलेला सिमेंट खर्च ,एस.के. ट्रान्सपोर्ट 1,00000/ शंकर चौगुले 1,00000/ डी.डी बेळगावकर 1,00000/अनिता गावडा 59,921/ कै सुभाष हदगल यांच्या स्मरणार्थ हेमा हदगल 51,000/ बालवीर महिला सोसायटी 54,000/महेश बिर्जे 51,000/ बेनी पिंटू 51,000/परशराम झंगरूचे 51,000/ उमेश कुबल 50,000/प्रकाश पाटील 51,000/ प्रमोद अशोक पाटील 11,000/सागर हुद्दार 11,000/ मनोहर बेळगावकर 11,000/ मंगेश चिवटे 11000 रुपयांची ग्रंथसंपदा, गिरीश तेंडुलकर संपूर्ण इलेक्ट्रिक फिटिंग खर्च,ॲड. सुधीर चव्हाण 10,001/ प्रताप सुतार 5,000/ शिवाजी बेटगेरीकर 25,000/ डॉ. नितीन राजगोळकर 21,000/ एस.एम जाधव 25,000/ अशा अनेक दात्यानी बालवीरने उभारलेल्या पवित्र अशा या विद्येच्या ज्ञान मंदिरास मदतीचा हात पुढे करून बालवीरच्या या शुभकार्यात खारीचा वाटा उचलला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबामधील मुलांना दर्जेदार शिक्षण देणारी एक प्रयोगशील शाळा म्हणून अल्पावधीतच नावारूपास आलेल्या बालवीर विद्यानिकेतन शाळेचे कौतुक करत बेळगाव मधील मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे अधिकारी मंगेश चिवटे यानी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना दिली.
यावेळी व्यासपीठावर लक्ष्मण होनगेकर, विजय पावशे, सोमशेखर सुतार, रिता बेळगावकर ,मंगेश हुक्केरीकर, रघुनाथ गावडा, मोहन मुतगेकर, सचिन जाधव उपस्थित होते. बाल विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने 12व्या स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात सांग सांग भोलानाथ,हिरव्या हिरव्या डोंगरावर, आनंदाची शाळा, झुंजू मुंजू पहाट झाली, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, या धरणी आईला वाचवा, भातुकलीचा खेळ, जाणता राजा, सिंधुताई सपकाळ, राजस्थानी नृत्य, आर्मी डान्स, नाटक असे वेगवेगळे संदेश देणारी एकापेक्षा एक सरस नृत्ये सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाला बालवीरचा संपूर्ण परिवार, देणगीदार, शाळेचे हितचिंतक, पालक, शिक्षक, विद्यार्थी यासह रसिकश्रोते, मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. डी .बेळगावकर यांनी केले. स्वागत व ओळख प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री कदम व सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांनी केले.आभार पूजा पाटील यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालवीर संचालक मंडळ, माध्यमिक मुख्याध्यापिका मंगल पाटील व शिक्षकवृंद व पालक यांनी विशेष मेहनत घेतली.
