गर्लगुंजी गावातील सरकारी मुला-मुलींच्या शाळेला १९९५–९६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भेट दिली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या पहिली ते तिसरीच्या वर्गखोल्यांमध्ये माजी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खर्चाने सुंदर सुविचार व शाळा उपयोगी रंगीबेरंगी पोस्टर लावून संपूर्ण शाळा सजवली आहे.
शाळेत प्रवेश करताच विद्यार्थ्यांना सहज सुविचार वाचता यावेत, त्यातून चांगले विचार रुजावेत व त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा, हाच या उपक्रमामागील उद्देश असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले.
या उपक्रमाचे शाळेतील शिक्षकवर्ग व एसडीएमसी सदस्यांनी मनापासून कौतुक केले आहे.
याचबरोबर, गर्लगुंजी सरकारी मराठी मुलींच्या शाळेला माजी विद्यार्थ्यांनी वॉटर फिल्टर देऊन सहकार्य केले आहे.
या उपक्रमासाठी संतोष बिरजे, भुजंग मेलगे, संजय पाटील, ज्योतीबी यल्लारीचे, सरिता अग्नोजी, तेजस्विनी कुंभार, विजया अष्टेकर व रेणुका मेलगे (१९९५–९६ बॅच) यांनी आर्थिक मदत करून ‘शाळेत सुविचार, जीवनात संस्कार’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरवला आहे.
माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम; गर्लगुंजी शाळा सुविचारांनी सजली

माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम; गर्लगुंजी शाळा सुविचारांनी सजली
Related Posts
जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न
Spread the loveजीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा महान संदेश देणारे थोर समाज सुधारक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र…
किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात*
Spread the love*किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात* महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी बेळगावसह सीमाभागात मराठी सन्मान यात्रेची घोषणा युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष…
