Spread the love

*किणये कब्बड्डी स्पर्धेत पुरुष बैलहोंगल तर महिला बेळवट्टी संघाचे विजय*

पन्नास वर्षांची परंपरा असलेल्या नरवीर तानाजी युवक मंडळ किणये ता.बेळगाव येथे आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात
बैलहोंगल प्रथम व द्वितीय तर महिला गटात बेळवट्टी संघ प्रथम तर बालिका आदर्श देसुर संघ द्वितीय क्रमांक पटकावला.

सामाजिक कार्यकर्ते अशोक घागवे व सुवर्णकार राजू बेकवाडकर, डॉ.कृष्णा पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती डुकरे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके व कार्याध्यक्ष धनंजय पाटील,सुरज जाधव,राजू पाटील,महेश डुकरे, यांची उपस्थित होते.

मंडळाचे अध्यक्ष गुरव सर,अनिल पाटील,कृष्णा पाटील,रामलिंग गुरव, शिवाजी पाटील,यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.