बेळगाव येथील काडा कार्यालयात घटप्रभा प्रोजेक्टच्या संदर्भात मार्गदर्शन बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान काडाचे चेअरमन युवराज कदम यांनी भूषवले होते. बैठकीदरम्यान घटप्रभा प्रकल्पांतर्गत पाण्याचा योग्य व पुरेपूर वापर शेतकऱ्यांना कसा करून घेता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
पाण्याचा सदुपयोग करणाऱ्या सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फंक्शनल ग्रँटअंतर्गत प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात आले. तसेच इन्फ्रास्ट्रक्चर ग्रँटमधून ५ सोसायट्यांना प्रत्येकी ६० हजार रुपये, तर इतर १५ सोसायट्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. संबंधित सोसायट्यांचे अध्यक्ष व कार्यदर्शी यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आले.
यावेळी काडा ॲडमिनिस्ट्रेटर सतीश कुमार यांनी शेतकऱ्यांना पाण्याचा कार्यक्षम वापर, शेती उत्पादन वाढ आणि सरकारी योजनांचा प्रभावी लाभ कसा घेता येईल, यावर सखोल मार्गदर्शन केले. सहकार विभागाचे मुख्य पुजारी यांनीही शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
काडा चेअरमन युवराज कदम यांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अशा योजनांचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. सध्या निधी कमी असला तरी काडा प्रशासन आणि संघटित प्रयत्नांद्वारे शासनाकडून अधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून त्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या मार्गदर्शन बैठकीला विविध सोसायट्यांचे अध्यक्ष व कार्यदर्शी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेळगाव काडा कार्यालयात घटप्रभा प्रकल्पावर मार्गदर्शन बैठक; अनुदानाचे धनादेश वितरण
Related Posts
जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न
Spread the loveजीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा महान संदेश देणारे थोर समाज सुधारक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र…
किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात*
Spread the love*किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात* महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी बेळगावसह सीमाभागात मराठी सन्मान यात्रेची घोषणा युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष…
