*आवाहनाला प्रतिसाद मराठी सन्मान यात्रेला मदतीचा हात*
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्यावतीने सीमाभागात काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात येत्या प्रसत्ताकदिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथून सुरुवात होणार आहे.
या यात्रेसाठी युवा समिती सीमाभाग यांच्यावतीने लोकवर्गणीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते, याला प्रतिसाद म्हणून धर्मवीर संभाजी महाराज युवक मंडळ गाडे मार्ग शहापूर यांच्या वतीने रुपये तीस हजार तर बिचू गल्ली शहापूर येथील युवा कार्यकर्ते ओमकार संजय बैलूर यांच्या वतीने रुपये पाच हजार रक्कम अध्यक्ष शुभम शेळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील,अशोक घगवे,सुरज जाधव,राजू पाटील,उमेश पाटील,अमित पाटील,ओमकार बैलूरकर आदी उपस्थित होते.
