Spread the love

एपीएमसी पोलीस ठाण्याच्या तत्पर आणि संवेदनशील कार्यवाहीमुळे बेपत्ता झालेली मुलगी अवघ्या चार दिवसांत सुरक्षितपणे सापडल्याने नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले. माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली विश्वेश्वरनगर परिसरातील नागरिक व हितचिंतकांनी CPI यू.एस. आवटी व एपीएमसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
काही दिवसांपूर्वी परिसरातील एक मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर CPI यू.एस. आवटी व त्यांच्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवत प्रभावी तपास केला. पोलिसांच्या मेहनतीमुळे मुलगी सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आली.
या यशस्वी कामगिरीबद्दल आयोजित सत्कार समारंभात माजी महापौर विजय मोरे यांनी पोलिसांच्या तत्परतेचे व कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले. यावेळी दयानंद कदम, रविंद्र कलगडी, अ‍ॅलन विजय मोरे, गंगाधर पाटील, अवधूत टी., ओम कांबळे, मुलीचे कुटुंबीय व स्थानिक नागरिक उपस्थित होते.