शांताई विद्या आधार फाउंडेशनकडून दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत

बेळगाव :
शांताई विद्या आधार फाउंडेशनच्या वतीने ज्ञानमंदिरा इंग्लिश मिडियम हायस्कूलमधील दोन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत देण्यात आली. टिळकवाडी येथील रॉय रोडवरील शांताई विद्या आधार कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या पालकांना धनादेश सुपूर्द करण्यात आले.
या कार्यक्रमास विजय पाटील, चंद्रकांत बोगार, विनायक बोंगाळे, अॅलन विजय मोरे तसेच विश्वास पाटील यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना विजय पाटील यांनी सांगितले की, शांताई विद्या आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यात आली आहे. समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांनी शांताई विद्या आधार फाउंडेशनला जुन्या वर्तमानपत्रांच्या स्वरूपात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. जुन्या वर्तमानपत्रांच्या विक्रीतून मिळणाऱ्या निधीचा उपयोग अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केला जातो, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमातून शांताई विद्या आधार फाउंडेशनची शिक्षणप्रसारासाठीची सामाजिक बांधिलकी आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
शांताई विद्या आधार फाउंडेशनकडून दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत
Related Posts
जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न
Spread the loveजीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा महान संदेश देणारे थोर समाज सुधारक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र…
किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात*
Spread the love*किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात* महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी बेळगावसह सीमाभागात मराठी सन्मान यात्रेची घोषणा युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष…
