Spread the love

बेळगाव जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मोत्सव वडगाव, बेळगाव येथील मंगाईनगर सोमेश्वरी हॉलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 10 वाजता झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास शिवसेना उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, अमर कडगांवकर, नारायण पाटील, महेश गावडे, मंगेश पोटे, भालचंद्र उजगावकर, सहदेव रेमानाचे, मंजू कडोलकर, बाळू भोसले, किशोर तरळे, अतुल सांबरेकर, रमण राव, रमेश हसबे, शुभम पवार, अनिकेत नरगुंदकर, पवन उंदरे, महेश हसबे आदी शिवसैनिक उपस्थित होते.