नेताजी सुभाष चंद्रबोस यांचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणावे किरण जाधव.
बेळगांव तारीख 24. तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य दिन अशी सिंहगर्जना करणाऱ्या भारत मातेचे थोर सुपुत्र नेताजी सुभाष चंद्रबोस यांचे विद्यार्थ्यांनी विचार आचरणात आणावे आणले पाहिजे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात राष्ट्रप्रेम राहणे गरजेचे आहे शिक्षकांच्या अज्ञानुसार शिक्षण घेत जीवनात यशस्वी ही होणे काळाची गरज आहे असे उद्गगार नेताजी सुभाषचंद्र जयंतीच्या उद्घाटनप्रसंगी विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी काढले.
टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर मजगांव येथील
नेमाव्वा कुडची हायस्कूल आयोजित टिळकवाडी माध्यमिक विभाग शारीरिक शिक्षक संघटनेच्यावतीने 129 व्या नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती , शारीरिक शिक्षण दिन शुक्रवार ता,23 जानेवारी रोजी
साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाच्या उद्घाटनला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार ,माजी उपमहापौर आनंद चव्हाण ,विमल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव अध्यक्षस्थानी जे. यू. घाडी(सचिव, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, बेळगाव) बेळगांव शहराच्या शारीरिक शिक्षण अधिकारी, जहिदा पटेल ,टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्षा सिल्व्हिया डिलीमा सचिव प्रवीण पाटील, जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर पी वंटगुडी, सामाजिक कार्यकर्ते दीपक सातगौडा, वसंत परमाजा,
संजय बेळगावकर, मुख्याध्यापक विनायक दिग्गाई सत्कारमूर्ती निवृत्त शारीरिक शिक्षण शिक्षक
देवकुमार मंगण्णाकर, श्री सोमशेखर हुद्दार, देवेंद्र कुडची मुख्याध्यापक पांडु माकण्णावर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर टिळकवाडी विभागातील 23 माध्यमिक शालेय विद्यार्थी शानदार पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. व शारीरिक कवायती सादर केल्या.
यानंतर निवृत्त क्रीडाशिक्षक संशोकर उद्धार देवकुमार मंगनाकर यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा ही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी महापौर मंगेश पवार माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर ,जयसिंग धनाजी, आकाश लाड ,बापू देसाई, अर्जुन भेकणे, रामलिंग परीट, एच बी पाटील, शिला सानिकोप्प, अनिल गोरे, प्रकाश कोरी,पुजा बुद्रुक,यशोदा,चंद्रकांत पाटील, पी एस कुरबेट, शिवकुमार सुंकद, उमेश मजुकर, कौशीक पाटील, संतोष दळवी, बाळकृष्ण, बी जी सोलोमन, सह शिक्षक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पवार तर पद्मराज बस्तवाड यांनी आभार मानले.
बे
ळगांव प्रमुख पाहुणे महापौर मंगेश पवार, किरण जाधव, आनंद चव्हाण, यु जी घाडी,आर पी वंटगुडी व इतर मान्यवर मानवंदना स्वीकारताना.
