समाज सारथी सेवा संघाच्या अध्यक्षपदी प्रा .सी. एम . गोरल तर सेक्रेटरी पदी बी. एन . मजुकर यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांची निवड.
येळळूर, ता. 24:
नेताजी भवण येळळूर येथे समाज सारथी सेवा संघाची बैठक नुकतीच पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी बळीराम देसूरक होते . संघाच्या ध्येय धोरणाची चर्चा झाल्यानेतर सर्वानुमते आकरा सदस्यांची कार्यकारणी एकमताने निवडण्यात आली . अध्यक्ष प्रा. सी . एम .गोराल उपाध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी सेक्रेटरी बी. एन. मजुकर , उपसेक्रेटरी डॉ. तानाजी पावले , खजिनदार अभियंता हणमंत कुगजी , हिशोब तपासणीस निवृत मुख्याध्यापक गोविंद काळसेकर यांची तर संपर्क अधिकारी म्हणुन हणमंत पाटील , राजु पावले ,प्रकाश पाटील , सुरज गोरल व रमेश जयराम धामणेकर यांची निवड करण्यात आली ही निवड एक वर्षासाठी असल्याचे यावेळी सांगण्यात आले . संघाच्या वतीने गावातील शैक्षणिक ‘सामाजिक , समस्ये बरोबर महिला सबलीकरण कामगार , शेतकरी , विद्यार्थी आणि गावात वाढलेली व्यसनाधिनता यावर काम करण्यासाठी ही संस्था स्थापन केली असल्याचे यावेळी आपल्या प्रास्ताविकामध्ये सतिश देसूरकर यानी सांगीतले निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे प्रकाश अष्टेकर यानी अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . बैठीकीचे सुत्रसंचलन अनिल हुंदरे यानी व आभार संजय गोरल यानी मानले.यावेळी संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते .

