गोकाक : गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे बसमध्ये प्रवास करताना, जत्रांमध्ये किंवा इतर ठिकाणी हरवलेले मोबाईल फोन सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढण्यात आले असून, एकूण १९ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
नागरिकांनी आपले मोबाईल हरवल्यानंतर पोलीस ठाण्यात किंवा केएसपी (KSP) अॅपवर तक्रारी नोंदवल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी सीईआयआर पोर्टलचा वापर करून तांत्रिक तपास केला आणि हरवलेले मोबाईल शोधण्यात यश मिळवले.
गोकाक ग्रामीण पोलिसांच्या या कार्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल हरवल्यास विलंब न करता केएसपी अॅप किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. त्यामुळे हरवलेले मोबाईल शोधण्यास मदत होऊन ते पुन्हा मालकांच्या ताब्यात देता येतात.

सीईआयआर पोर्टलच्या मदतीने हरवलेले १९ मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात; गोकाक ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
Related Posts
भरधाव दुचाकीची धडक; एम. के. हुबळीतील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
Spread the loveकित्तूर : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एम. के. हुबळी येथील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव…
आरसीबीच्या विजयाचा जल्लोष पाहायला निघालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; बुलेट दुचाकी डिव्हायडरवर आदळली
Spread the loveबैलहोंगल शहरात आरसीबीच्या आयपीएल विजयानंतरचा जल्लोष पाहण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनायक अनिल रायर (वय 23, रा. बसवनगर, 4 था…
