बैलहोंगल शहरात आरसीबीच्या आयपीएल विजयानंतरचा जल्लोष पाहण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
विनायक अनिल रायर (वय 23, रा. बसवनगर, 4 था क्रॉस, बैलहोंगल) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी आयपीएल अंतिम सामन्यात आरसीबी संघाने विजय मिळवल्यानंतर सुरू असलेला जल्लोष पाहण्यासाठी विनायक हा आपल्या रॉयल एनफिल्ड बुलेट (केए-24 ईबी-4503) दुचाकीवरून चन्नम्मा सर्कलकडे जात होता. रात्री सुमारे 11.10 वाजण्याच्या सुमारास पाटील कॉम्प्लेक्ससमोरील डबल रस्त्यावर भरधाव वेगात दुचाकी चालवत असताना त्याचा ताबा सुटला आणि दुचाकी थेट रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर आदळली.
या अपघातात विनायक गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री 11.30 वाजता त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी विरुपाक्ष नागप्पा रायर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 204/2026 नोंद करण्यात आला असून बीएनएस कलम 281 व 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
या घटनेमुळे बैलहोंगल परिसरात हळहळ व्यक्त होत असून रायर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आरसीबीच्या विजयाचा जल्लोष पाहायला निघालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; बुलेट दुचाकी डिव्हायडरवर आदळली
Related Posts
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन
Spread the love*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन सालाबाद प्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र…
सावगाव मराठी शाळेत कन्नड शाळेला विरोध; ग्रामस्थांच्या भूमिकेनंतर पर्यायी जागेचा निर्णय
Spread the love सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नडी शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात आला यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मोठ्या संख्येने…
