“स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमी, बेळगाव येथे यशाचा सोहळा; गोवा व बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर विद्यार्थ्यांची निवड”

बेळगाव : स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमी, बेळगाव येथे आज दुपारी १२.३० वाजता विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक विधानपरिषदेचे माजी सरकारी मुख्य सचेतक व के.एल.ई. सोसायटीच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य श्री. महांतेश एम. कवटगीमठ तसेच बेळगाव विमानतळाचे संचालक श्री. एस. थियागराजन हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी म्हणून स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीच्या सीईओ व श्री सरस्वती इन्फोटेकच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. ज्योती विनोद बामने उपस्थित होत्या.
या सत्कार समारंभात गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ व बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. सत्कारप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये प्रियांका कुलकर्णी (विजयापूर), सुहानी बागडे (बेळगाव), निकिता गवाडे (चंदगड), संजना मदलबावी (दांडेली), पल्लवी लगळी (जमखंडी), शिवू मुसळी (बेळगाव), मुजम्मिल दरक्सी (अतणी), तेजस्विनी रेड्डी (बेळगाव), रोहित गडिवीर (बेळगाव), साकिब दरगाह (विजयापूर), सादिक बेपारी, विनायक कोट्टारशेट्टी (बेळगाव), संजना रेनके (बैळहोंगल) आणि स्नेहा साळुंके (बेळगाव) यांचा समावेश होता.
सत्कारावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, प्रवेशाच्या वेळी ते अत्यंत कच्चे होते, आत्मविश्वास व योग्य मार्गदर्शनाचा अभाव होता. मात्र स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीमधील प्रशिक्षणामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र परिवर्तन झाले आणि आजच्या यशामागे अकॅडमीचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्या पाल्यांचे यश पाहून पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. विनोद बामने व सौ. ज्योती विनोद बामने यांचे विद्यार्थ्यांच्या करिअर घडवण्यासाठी दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. हा यशाचा सोहळा स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यात आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
