Spread the love

श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने रविवारी भव्य रक्तदान शिबीर

श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी उपयुक्त असे उपक्रम राबविण्याची परंपरा या संघटनेने कायम जपली असून त्याचाच एक भाग म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
रक्ताची गरज असणाऱ्या गरजू रुग्णांसाठी या शिबिरातून मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन होणार असून तरुण वर्गाने या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. “रक्तदान हे श्रेष्ठदान आहे” या विचारातून प्रेरणा घेत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
श्री राम सेना हिंदुस्थान ही संघटना सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असते.रक्तदाना सारखा समाजोपयोगी उपक्रम राबवला जात असल्याने परिसरातून या उपक्रमाचे विशेष स्वागत होत आहे.
या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
स्थळ~सद्गुरू सदानंद महाराज मठ राजहंस गल्ली अनगोळ
दिनांक~28/12/2025