- बेळगाव : जे

न्ट्स ग्रुप ऑफ बेलगामच्या पुढाकाराने आज सैनिक नगर, लक्ष्मीटेक येथील जीवन आधार आश्रम येथे वास्तव्यास असलेल्या २५ निराधार वृद्ध महिलांसाठी धान्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आधार देणारा हा उपक्रम अत्यंत संवेदनशील आणि स्तुत्य ठरला.
या सामाजिक उपक्रमाचा संपूर्ण खर्च जेन्ट्स ग्रुप ऑफ बेलगामचे उपाध्यक्ष श्री. अरुण काळे यांच्या भगिनी सौ. शोभा काळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उचलत सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण समाजासमोर ठेवले.
या कार्यक्रमास जेन्ट्स ग्रुप ऑफ बेलगामचे सदस्य सुनील मुत्गेकर, शिवकुमार हिरेमठ, आकाश लाटुकर, राहुल बेलवलकर, अजित कोकणे, आनंद कुलकर्णी, सुनील पवार, मधु बेळगावकर, अरुण काळे, प्रकाश तानजी आदी सदस्यांनी आपला बहुमोल वेळ देत आवर्जून उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या शेवटी आश्रम प्रशासन व लाभार्थी वृद्ध महिलांच्या वतीने जेन्ट्स ग्रुप ऑफ बेलगाम तसेच सौ. शोभा काळे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकी, संवेदना आणि सामाजिक जबाबदारी अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
“जेन्ट्स ग्रुप ऑफ बेलगामचा माणुसकीचा उपक्रम; जीवन आधार आश्रमातील २५ निराधार वृद्ध महिलांना धान्य वाटप”
Related Posts
स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमी, बेळगाव येथे यशाचा सोहळा; गोवा व बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर विद्यार्थ्यांची निवड”
Spread the love“स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमी, बेळगाव येथे यशाचा सोहळा; गोवा व बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर विद्यार्थ्यांची निवड” बेळगाव : स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमी, बेळगाव येथे आज दुपारी १२.३० वाजता विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव…
येळ्ळूर मधील विविध संघटनेच्यावतीने पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार*
Spread the love*येळ्ळूर मधील विविध संघटनेच्यावतीने पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार* *बेळगांव दि.* – साहित्य व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे, येळ्ळूर गावाशी सलोख्याचे, सहकार्याचे नाते जपणारे, दूरदृष्टीने के…
