Spread the love

*स्कूल गेम 2025 राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी*

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे जिल्हातून निवड झालेले स्केटर्स स्कूल गेम 2025 राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धे मध्ये 300 च्या वर कर्नाटक राज्यातील टॉप स्केटिंग पटू सहभाग घेतला होता या स्पर्धा बेंगलोर येथे पार पडल्या.या स्पर्धेत बेळगांव च्या स्केटर्स नी चमकदार कामगिरी करत 3 सुवर्ण,6 रौप्य व 4 कांस्य अशी एकूण 13 पदके जिंकली

*पदक विजेते स्केटर्स खालील प्रमाणे*

जानवी तेंडूलकर 2 सुवर्ण, रश्मीता आंबिगा 2 रौप्य,1 कांस्य, आराध्या पी 1 सुवर्ण,1 रौप्य,शल्य तरळेकर 1 रौप्य,1 कांस्य, ऋत्विक दुबाशि 1 रौप्य, करूणा वाघेला 1 कांस्य, अवनीश कामन्नवर 1 रौप्य,1 कांस्य

वरील सर्व स्केटर्स के एल ई सोसायटी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड स्केटिंग रिंक वर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून या सर्वांना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, कर्नाटका रोलर स्केटिंग असो चे जनरल सेक्रेटरी इंदुधर सीताराम याचे प्रोत्साहन मिळत आहे