Spread the love

*नंदगड बाजारपेठेत हुतात्मादिनाची जागृती*

1956 साली स्वतंत्र भारतात भाषांवर प्रांतरचना करतांना तात्कालीन केंद्र सरकारने अन्यायाने 40 लाख मराठी बहुभाषिकांना त्या वेळच्या म्हैसूर प्रांतात म्हणजेच आत्ताचे कर्नाटक यामध्ये डांबल्याच्या निषेधार्थ सीमाभागासह मुंबई प्रातांत म्हणजेच आत्ताच्या महाराष्ट्रात आंदोलन छेडले गेले या आंदोलनात अनेक हुतात्मे झाले त्या मध्ये खानापूर तालुक्याचे कै. नागाप्पा होसुरकर हे ही धारातीर्थी पडले.

या धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी खानापूर हुतात्मा स्मारक येथे आयोजन केले जाते या हुतात्म्यांना बहूसंख्येने अभिवादन व्हावे यासाठी खानापूर तालुका समितीची वतीने आज नंदगड येथील बुधवारच्या आठवडी बाजारातून व्यापक जागृती फेरी काढण्यात आली. यावेळी जागृती पत्रके वाटून हुतात्मादिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. पत्रके वाटताना संयुक्त महाराष्ट्रच्या व हुतात्मे अमर रहे च्या घोषणांही देण्यात आल्या. शनिवार दिनांक 17 जानेवारी सकाळी 8.30 वाजता बहुसंख्येने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

या पत्रक वाटून जागृती करतेवेळी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी,तज्ञ कमिटी सदस्य प्रकाश चव्हाण, युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, मध्यवर्तीचे गोपाळ पाटील, रणजीत पाटील, राजाराम देसाई, डीएम भोसले, प्रवीण पाटील,पुंडलीक पाटील,विनायक चव्हाण, चन्नेवाडी गावचे दिलीप पाटील, ज्योतिराव पाटील, कल्लाप्पा पाटील, सुधाकर पाटील, विष्णू पाटील, पांडुरंग पाटील, नंदगडचे संभाजीराव पारिषवाडकर प्रभू पारिषवाडकर,अशोक देसाई, कल्लाप्पा वीर, मल्लू देसाई,रुद्राप्पा इस्रान, विष्णू पठाण, नारायण पाटील, नारायण पेडणेकर, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.