*श्रींगारी कॉलनीतील रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार*
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शहापूर उपनगर शिवशक्ती मिलन वीर संगोळी रायण्णा आणि केअर अँड क्युअर दवाखाना यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर शिवतेज अपार्टमेंट खासबाग येथे आयोजित करण्यात आले होते डॉ शुभम दळवी बीएचएमएस व डॉ शिल्पा पुजारी बीएचएमएस(सीजीओ) यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, हाडांचे आजार, हिमोग्लोबिन रक्त तपासणी व इतर आरोग्य विषयी तपासणी मोफत करण्यात आली या वेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी 50 च्या वर रक्तदात्यानी उस्फूर्तपने रक्तदान केले आयोजका तर्फे रक्तदान करणारा प्रत्येक व्यक्ती ला भेट म्हणून डोक्यावरील हेल्मेट देण्यात आले या शिबिरात श्रींगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी, बाडीवाले कॉलनी कुंती नगर या व इतर परिसरातील 400 च्या वर नागरिकांनी सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घेतला हे शिबिर यशस्वी करणेसाठी दिनेश पाटील, प्रकाश पाटील, आकाश दलभजन, माधव मुरकुंबी, मंथन तारीहाळकर, राज कदम, सोहम हिंडलगेकर, लालू बाडीवाले या सर्वांचे आणि इतरांचे सहकार्य लाभले
