Spread the love

*विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा करण्यात आला श्रींगरी कॉलनीचा उपक्रम*

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ श्रींगरी कॉलनी,बाडीवाले कॉलनी व टीचर्स कॉलनीच्या गणपती उत्सवाची विविध व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ झाला या कार्यक्रमला बेळगांव महानगरपालिका च्या उपमहापौर वाणी जोशी, वॉर्ड क्रमांक 21 च्या नगरसेविका प्रीती कामकर, एंजल फाऊंडेशन च्या मीनाताई बेनके,सौ पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे 450 महिलांनी सहभाग घेतला होता तसेच सत्यनारायण महापूजा, विष्णु सहस्र नाम जप, अन्नपूर्णेश्वरी मंत्र, गणपती महाआरती असे कार्यक्रम घेण्यात आले तसेच मोठ्या प्रमाणात महाप्रसाद घेण्यात आला हा महाप्रसाद बेळगांव दक्षिण चे आमदार अभय पाटील साहेब यांचे बंधू श्री शितल पाटील यांच्या शुभ हस्ते वाटण्यात आला यावेळी समाजसेवक श्री विनायक कामकर ,नगरसेवक जयंत जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते लहान मुलांसाठी फिट इंडिया स्ट्राँग इंडिया वॉकिंग रॅली व रनिंग स्पर्धा ,करम, बुद्धिबळ, क्रिकेट, फुटबॉल, चित्रकला डान्स व गाण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते गणपती विसर्जन मिरवणूकसाठी बेळगांव दक्षिण चे आमदार अभय पाटील यांच्या शुभ हस्ते पूजा करून चालना देण्यात आली यावेळी आमदार अभय पाटील यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 2025 सालाची श्री गणेश मूर्ती मंडळाला दिलेबद्दल श्री विश्वनाथ येल्लूरकर यांचा सत्कार आमदार साहेबांच्या हस्ते शाल आणि सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला यावेळी समाजसेवक प्रविण पिळणकर व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच मंडळाला समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीनि भेटी देऊन सहकार्य केले यामध्ये समाजसेवक दत्ता जाधव, उद्योगपती सुरेश वीरनगौडर प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर श्री अशोक गोरे, शिवशंकर मल्लूर, आर एस एस चे श्री रेवणकर , रणजित मनोळकर,श्री परागी व इतर मान्यवर यांचा समावेश होता.हे सर्व सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी गणपती मंडळाचे स्वागत अध्यक्ष ॲड शिवकुमार उडकेरी व अध्यक्ष श्री तुकाराम शिंदे परमपुज्य गणपत वडेर गुरुजी, श्री जोशी गुरुजी सह, विनायक काकतीकर सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येळुरकर, संतोष श्रींगरी, शंकर कांबळे सोहम हिंडलगेकर, अनिश पोटे, प्रणय हनगोजी, चंद्रकांत सावंत,अनिल अणवेकर,सुरेश उदनुर, जगदीश बडिगेर , विश्वनाथ काकडे जयेश भातकांडे, चंद्रशेखर नाईक, अभिषेक मराठे मंजु आर्कसाली संदीप रायकर,प्रकाश शहापूरकर, बाळू मिराशि,प्रकाश श्रेयेकर, श्रेयांश कदम,अक्षय शहापूरकर,लालू बाडीवाले, लक्ष्मण सोनटकी,महादेव दळवी,प्रकाश इंगळे, गजानन तुडवेकर रविकुमार कम्मार, शंकरप्पा हिरगुप्पी,प्रकाश इंगळे, श्री खन्नूकर, सिद्धू संबरगी , विजय पाटील, या आणि मंडळाच्या ईतर कार्यकर्त्यांनी यांनी भरपूर परिश्रम घेतले.