गोवा संगीत सितारा 2025” : बॉलिवूड LIVE गायन स्पर्धेसाठी नोंदणीला कलाकारांचा वाढता प्रतिसाद!
स्वर संगम कला मंदिरतर्फे आयोजित “ताल से सूर तक… गोवा संगीत सितारा 2025” ही भव्य बॉलिवूड लाईव्ह गायन स्पर्धा गोव्यात प्रथमच 28 डिसेंबर रोजी फातोर्डा येथील रवींद्र भवन ओपन एअर हॉलमध्ये होत आहे. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील गायकांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेत सर्व वयोगटातील कलाकारांना आपल्या आवाजाचे जादू दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या प्रतिष्ठित स्पर्धेचा विजेता तब्बल रु. 50,000 चे आकर्षक बक्षीस जिंकणार असून उपविजेत्यांसाठी विशेष पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय 10 स्पर्धकांना प्रत्येकी 5,000 रुपयांची विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत. दिग्गज गायकांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या भव्य व्यासपीठावर सादरीकरणाची संधी मिळावी म्हणून गायकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
नोंदणीची शेवटची तारीख 10 डिसेंबर असून मर्यादित जागा असल्याने आयोजकांनी तत्काळ नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
📞 नोंदणी व माहिती:
9850461097 / 7559231973
कलाकारांसाठी आपल्या प्रतिभेला नवा मंच देणारी ही स्पर्धा ठरण्याची खात्री असल्याने मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू झाली आहे.
