Spread the love

गोव्यात मेगा लकी ड्रॉ स्कीमचे भव्य लॉन्चिंग; प्रमुख पाहुण्यांकडून उपक्रमाचे कौतुक

मडगाव – गोवा | २३ नोव्हेंबर २०२५
‘बेळगाव बिग फर्निचर अँड इंटिरियर एक्स्पो 2025’ अंतर्गत उद्यमबाग, बेळगाव येथील कलाश्री बंब अँड स्टील फर्निचर आणि ओम साई इंडस्ट्रीज यांनी सुरू केलेल्या मेगा लकी ड्रॉ स्कीमचे गोव्यात भव्य लॉन्चिंग करण्यात आले. एक्स्पोमध्ये गाजत असलेल्या फोर इन वन बंबसोबतच या योजनांचे अनावरण प्रमुख आकर्षण ठरले.

फक्त ₹500 भरून, किंवा ₹10,000 ची शोरूम खरेदी अथवा ₹15,000 ची एफडी केल्यास ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार असून, ट्रॅक्टर, क्विड कार, बैलजोडी, आयफोन, इलेक्ट्रिक स्कूटर, फोर इन वन बंब, सोलार मेंढा यांसह एकूण 20 भव्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे.

लॉन्चिंगप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करताना सांगितले—

> “गोव्याच्या जनतेला नक्कीच आवडणारी, सर्वांसाठी परवडणारी आणि फायद्याची अशी योजना. फक्त पाचशे रुपयांत इतक्या मोठ्या बक्षिसांमध्ये सहभागी होता येणे ही लोकाभिमुख संकल्पना आहे.”

 

त्यांनी पुढे सांगितले की, ही स्कीम ग्राहकांचा विश्वास वाढवणारी तसेच सर्वसामान्यांना मोठी बक्षिसे जिंकण्याची संधी देणारी असल्यामुळे अत्यंत प्रशंसनीय आहे.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लकी ड्रॉचे कुपन आणि संपूर्ण स्कीमचे भव्य अनावरण करण्यात आले आणि गोव्यात या उपक्रमाला औपचारिक सुरुवात झाली.