साउथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित जीएसएस पदवी पूर्व महाविद्यालय यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा
दिनांक 30 डिसेंबर 2025 मंगळवार रोजी उत्साहात पार पडला. हे स्नेहसंमेलन महाविद्यालयातील के. एम गिरी सभागृहात पार पडले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री पंकज शिवलकर, पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष देसाई, उपप्राचार्य सचिन पवार, विद्यार्थी परिषदेचे प्रमुख प्रा. अनिल खांडेकर, विद्यार्थी समुपदेशक प्रा. प्रवीण पाटील, क्रीडा प्रशिक्षक प्रशांत मंकाळे, विद्यार्थी प्रतिनिधी ईशान नाडकर्णी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रेया गरगट्टी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अर्पिता हवनूर हिच्या स्वागत गीताने झाली त्यानंतर प्राचार्य सुभाष देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. दीपक लोखंडे यांनी प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज शिवलकर यांचा परिचय करून दिला.. प्राचार्य सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी परिषदेचे प्रमुख प्रा अनिल खांडेकर यांनी वार्षिक अहवाल सर्वांसमोर सादर केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील यांनी आपल्या महाविद्यालयीन जुन्या आठवणींना उजाळा दिला सोबतच विद्यार्थ्यांना योग्य शब्दात मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, संयम आणि चिकाटीचे महत्त्व सांगितले.
या सोहळ्यात राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा, एनएसएस, एनसीसी या क्षेत्रात सहभाग घेऊन प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ पार पडला. यामध्ये टेबल टेनिस, स्विमिंग,बॅडमिंटन, कराटे, हँडबॉल, बास्केटबॉल, हॉकी, मार्शल आर्ट्स अशा विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. याप्रसंगी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानपत्र आणि पदक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातर्फे वार्षिक सर्वोत्तम विद्यार्थी आणि विद्यार्थिनी याचे बक्षीस यावेळी जाहीर करण्यात आले. मास्टर ईशान नाडकर्णी हा सर्वोत्तम विद्यार्थी आणि कुमारी तनिष्का नावगेकर ही सर्वोत्तम विद्यार्थीनी म्हणून या बक्षीसाचे मानकरी ठरले. मास्टर ईशान नाडकर्णी यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डाॅ किर्ती फडके यांच्या समूहाने केले, पारितोषक वितरण सोहळा प्रा सोनिया चिठ्ठी यांच्या समूहाने पार पडला. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
साउथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित जीएसएस पदवी पूर्व महाविद्यालय यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा
Related Posts
जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न
Spread the loveजीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा महान संदेश देणारे थोर समाज सुधारक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र…
किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात*
Spread the love*किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात* महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी बेळगावसह सीमाभागात मराठी सन्मान यात्रेची घोषणा युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष…
