- चेन्नई येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशन आयोजित जलतरण स्पर्धेत ज्यामध्ये भारतासह इतर दहा देशातील जलतरपटूंनी भाग घेतला त्यामध्ये बेळगावच्या मयांक हलदर याने भारताचे प्रतिनिधित्व करताना दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली त्याने 50 मीटर फ्रीस्टाइल सुवर्णपदक व 25 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये सुवर्णपदक मिळवून बेळगावचे नाव संपूर्ण देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकविले याबद्दल आबा स्पोर्ट्स क्लब व हिंदी स्पोर्ट्स क्लब, क्रीडा भारती बेळगाव यांच्यातर्फे त्याचा बेळगाव रेल्वे स्टेशनवर आगमनाच्या वेळेला सन्मान करण्यात आला. या वेळेला मयांकचे आई-वडील तसेच आबा स्पोर्ट्स क्लब चे जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार, विशाल वेसने, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, सुधीर धामणकर, मोहन पत्तार , सूर्यकांत हिंडलगेकर, पद्मप्रसाद हुली, गणेश दडीकर, हर्षाली पाटील, अनंत पाटील व इतर मान्यवर क्रीडाप्रेमी उपस्थित होते.


आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या मयांक हलदरची सुवर्णझेप; दोन सुवर्णपदकांनी देशाचे नाव उज्वल
Related Posts
मुलगी झाल्याचा राग? पित्यानेच घेतला निष्पाप बालिकेचा जीव
Spread the loveबेळगाव जिल्ह्यातील काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भूतरामट्टी गावात अवघ्या १४ दिवसांच्या नवजात बालिकेची विष पाजून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र…
श्रींगारी कॉलनीतील रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार*
Spread the love*श्रींगारी कॉलनीतील रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शहापूर उपनगर शिवशक्ती मिलन वीर संगोळी रायण्णा आणि केअर अँड क्युअर दवाखाना यांच्यावतीने मोफत आरोग्य…
