Spread the love

कृष्णा देवगाडी ठरला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’चा मानकरी
बेळगाव | प्रतिनिधी
दि. 20 व 21 डिसेंबर 2025 रोजी के.पी.टी.सी.एल. समुदाय भवन, शिवबसव नगर, बेळगाव येथे बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या वतीने 6 वी राष्ट्रीय कराटे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत पंजाब, हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा आदी विविध राज्यांतील 1200 हून अधिक कराटेपटूंनी सहभाग नोंदवून स्पर्धेला राष्ट्रीय स्तरावरील भव्यतेचे स्वरूप दिले.
या राष्ट्रीय स्पर्धेत कृष्णा देवगाडी याने अत्यंत दमदार व उत्कृष्ट कामगिरी करत ‘ओपन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला ₹25,000 रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
कृष्णा देवगाडी याला कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले असून बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष श्री. गजेंद्र काकतीकर व सचिव जितेंद्र काकतीकर यांचे मार्गदर्शन त्याला सातत्याने लाभत आहे.
कृष्णा देवगाडीच्या या घवघवीत यशाबद्दल कराटे क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक तसेच क्रीडाप्रेमींकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.