Spread the love

वंदे मातरम् १५० वर्षेपूर्ती निमित्त आमदार अभय पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 2025 साली 150 वर्षे पूर्ण होत असून संपूर्ण देशभरात नोव्हेंबर 2025 ते नोव्हेंबर 2026 या कालावधीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा ऐतिहासिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण पर्वाचे औचित्य साधत बेळगावचे लोकप्रिय आमदार अभय पाटील यांचा भारतमातेची प्रतिमा असलेला फोटो प्रदान करून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

हा सत्कार देशप्रेमी राजन वाघेला यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, नगरसेवक नंदकुमार मिरजकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सत्कार स्वीकारताना आमदार अभय पाटील यांनी या सन्मानाबद्दल आयोजकांचे आभार मानत वंदे मातरम् या गीताची देशाला एकत्र बांधणारी शक्ती आणि आगामी वर्षभर होणाऱ्या उपक्रमांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.

बेळगावात देशभक्तीच्या वातावरणात पार पडलेला हा सत्कार सोहळा विशेष लक्षवेधी ठरला.