बेळगाव ते अलारवाडी हलगा क्रॉस या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे सतत अपघातांची मालिका सुरू होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वकील संघटना तसेच मुलगा ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली होती.
या मागणीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित विभागाला निर्देश देत रस्त्याची रिपेअरिंग जलदगतीने पूर्ण करून संभाव्य अपघातांना आळा घातला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या त्वरित प्रतिसादाचे व जनहितातील कार्याचे गावकऱ्यांनी तसेच वकील संघटनेने मनापासून कौतुक केले.
या कामाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी वकील अण्णासाहेब घोरपडे, वकील के. के. यादगुडे, वकील विभूतीमठ, एम. एस. नांदेड, स्नेहा घोरपडे लाड, संजू कामत, राधे शापुरकर, शिल्पा कांबळे, पूजा भैकने, रोहित कडगावी, उमाताई अनगोळकर, कुंभार, सदानंद बिळगोजी, सागर कामानाचे, किरण हनमंताचे, दयानंद शिंदे, वासू सामाजी यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने केलेल्या जनहितकारी निर्णयाचे कौतुक करत “असेच जनआधारित कार्य लाभो” अशी भावना व्यक्त केली.
