Spread the love

बेळगाव पोलिसांनी अमेरिकन नागरिकांना फसवणूक करणारे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर रॅकेट भंडाफोड करत मोठी कारवाई केली आहे. बॉक्साईट रोडवरील कुमार हॉल येथे छापा टाकून तब्बल 33 आरोपींना अटक करण्यात आली असून 37 लॅपटॉप आणि 37 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई सीआयडी आणि पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस आयुक्त बोरसे यांनी सांगितले की, “सर्व पैलूंवर कसून तपास केला जात आहे आणि कुणालाही वाचवले जाणार नाही.”
🙏
मुख्य आरोपी गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये असल्याची माहिती समोर आली असून त्यांचा शोध पोलिसांनी तीव्र केला आहे. सध्या अटकेत असलेले कर्मचारी हे बेळगावातील नसून बाहेरून आणलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना पगारासह राहण्याची सोय देण्यात आली होती.

या रॅकेटद्वारे अमेरिकन नागरिकांना फोन करून विविध पद्धतींनी फसवण्यात येत होते. अमेरिकेत काही फस वणूकग्रस्तांनी स्थानिक एजन्सीकडे तक्रार दाखल केल्यानंतर माहिती भारतातील 🙏 एजन्सीकडे पोहोचली. मार्चपासून या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना नियमित पगार दिला जात होता.

पोलिसांनी या आंतरराष्ट्रीय 🙏 फसवणुकीविरोधात तपास अधिक गतीने सुरू केला असून लवकरच आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.