राजहंसगड येथील भंगी रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
या विकासकामांमुळे राजहंसगड गाव तसेच किल्ला परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस काडा अध्यक्ष युवराज अण्णा कदम यांनी मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचा हार अर्पण करून सत्कार केला. त्यानंतर माजी तालुका पंचायत सदस्य सिद्दाप्पा छत्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्ते कामांचा विधिवत शुभारंभ करण्यात आला.
भजनाच्या माध्यमातून कार्यक्रमास भक्तिमय वातावरण लाभले. त्यानंतर मंत्री महोदयांचे हळदी–कुंकू कार्यक्रमासाठी पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला संबोधित करताना मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर म्हणाल्या,
“राजहंसगड गावांसाठी तसेच राजहंसगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी मोठा निधी मंजूर करून विकासकामे हाती घ्यायची आहेत. त्यासाठी तुम्ही सर्वांनी अशीच भक्कम साथ द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गावातील विकास व विविध कामांसाठी सदैव मॅडमच्या पाठीशी राहण्याची ग्वाही देत अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमात महिलांना साड्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
सिद्दाप्पा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. जी. पवार सर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी देवस्थान पंच कमिटी, ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महिला वर्ग तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
राजहंसगडमध्ये मूलभूत सुविधांसह विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली असून, भविष्यातील विकासकामे पाहून इतर गावांनी आदर्श घ्यावा, अशा प्रकारचे काम येथे सुरू असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.


राजहंसगडातील रस्ते विकासाला गती; लक्ष्मीताई हेब्बाळकरांच्या हस्ते शुभारंभ
Related Posts
अनुजा बाळेकुंद्री यांची शिवा लोहारला ११ हजारांची आर्थिक मदत
Spread the loveअनुजा बाळेकुंद्री यांची शिवा लोहारला ११ हजारांची आर्थिक मदत माधुरी जाधव फौंडेशनच्या माध्यमातून सुपूर्द केला धनादेश डोळ्याच्या उपचारासाठी सहकार्याचा हात बेळगाव ..फटाक्यांच्या आतषबाजीत डोळा गमावलेल्या शहापूर येथील शिवा…
हंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात
Spread the loveहंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात बेळगाव दि. ११:हंदीगनूर येथे श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवार (दि. १० मार्च ) सकाळी उत्साहात पार पडला.…
