राजहंसगडला १ कोटींचा रस्ता निधी; ग्रामविकासासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सातत्यपूर्ण कार्य अधोरेखित
राजहंसगड –
बेळगाव ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपड करणाऱ्या कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण काम गावासाठी साध्य केले आहे. राजहंसगडमधील अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या भंगी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी त्यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर करण्यात आला.
गावातील नागरिकांना पावसाळा आणि उन्हाळ्यात प्रचंड त्रास देणारे हे रस्ते अनेक वर्षे दुर्लक्षित राहिले होते. मात्र गावातील परिस्थितीची गंभीर दखल घेऊन मंत्री हेब्बाळकर यांनी रस्ते विकासाला प्राधान्य देत तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या या निर्णयामुळे गावातील दळण–वळण, शेती आणि दैनंदिन वाहतुकीचे प्रश्न दूर होणार आहेत.
नुकतीच अधिकाऱ्यांसह या रस्त्यांची तपासणी व मोजमाप पूर्ण झाले असून पुढील काही दिवसांत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. काँक्रिटीकरणासाठी निश्चित केलेले चार मार्ग पुढीलप्रमाणे—
1. लक्ष्मण नावगेकर यांच्या घरापासून कृष्णा जाधव यांच्या घरापर्यंत
2. श्रीकांत मोरे यांच्या घरापासून भुजंग चव्हाण यांच्या घरापर्यंत
3. बसवंत चव्हाण यांच्या घरापासून किरण मोरे यांच्या घरापर्यंत
4. सतिश पवार यांच्या घरापासून दत्तू रामा मोरे यांच्या घरापर्यंत
दरम्यान, श्री सिद्धेश्वर मंदिरात पंच कमिटीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत या रस्त्यांबाबत एकही तक्रार नोंदवली न गेल्याने, सर्व ग्रामस्थांनी सर्वानुमते रस्ते तातडीने करण्याचा ठराव मंजूर केला. यामुळे हे काम अधिक वेगाने पार पडणार आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे—
<span;>> “आमच्या गावासाठी आजवर सर्वाधिक विकासकामे कोणाकडून झाली असतील, तर ती लक्ष्मी हेब्बाळकर मॅडमकडूनच. शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा, रस्ते—प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वाचे आहे.”
यामुळे गावात समाधानाची भावना निर्माण झाली असून ग्रामस्थांनी मंत्री हेब्बाळकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.
बैठकीस लक्ष्मण थोरवत, सुरेश थोरवत, पी. जी. पवार सर, गुरुदास लोखंडे, बसवंत पवार, सिद्धाप्पा पवार आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
