“विद्याभारती–संत मीरा शाळेच्या संयुक्त विद्यमाने सप्तशक्ती संगम; संस्कारवर्धक विचारांनी भारावला कार्यक्रम”

अनगोळ–बेलगाव येथील संत मीरा इंग्लिश माध्यम शाळा आणि विद्याभारती कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सप्तशक्ती संगम – 2025-26’ हा भव्य कार्यक्रम शाळेच्या माधव सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. पूजाविधी व सरस्वती वंदनेने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सोनाली सरनोबत, सौ. तृप्ती हिरेमठ, सौ. गौरी गजबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात महिलाशक्ती, संस्कार, पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, आणि सप्तदेवींच्या शक्तितत्त्वाचे आधुनिक समाजातील स्थान यावर प्रेरणादायी विचार मांडले गेले. ‘हिरवेच श्वास – श्वासच हिरवा’ हा संदेश विशेष ठरला. देवींच्या शक्तिरूपांचे आकर्षक छद्मवेश सादरीकरण कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
वीणा जिगिजिनी व राधा गुणगा यांचा साधक म्हणून सन्मान 🙏 करण्यात आला. शाळेची मुख्याध्यापिका आणि प्रांत कार्यवाहिका सौ. सुजाता दप्तरदार यांनी वंदनार्पण केले. २५० हून अधिक पालक, शिक्षक व सहभागींच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
