Spread the love

 

* *समाज सारथी सेवा संघटनेच्या पहिल्याच महामेळावाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
येळळूर, ता. 12:
आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या मात्र आपल्या सुरक्षितेपासून नेहमीच दुर्लक्षित राहणारा घटक म्हणजे बांधकाम कामगार असून सुरक्षितेसाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे असे सांगून प्रत्येकाने काम करताना सर्व नियमांचे पालन करावे आणि काळजी घ्यावी असे म.ए. समितीचे नेते आणि अभियंते आर. एम .चौगुले यांनी कामगारांना सांगितले . रविवार (ता. 11 )रोजी येळ्ळूर येथे समाज सारथी सेवा संघाच्या वतीने आयोजित केलेल्या बांधकाम कामगाराच्या महामेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्री. चांगळेश्वरी मंदिरामध्ये या कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आर.एम चौगुले यांनी कामगारांना मार्गदर्शनकेले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा लक्ष्मी मासेकर होत्या. बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड एन.आर.लातूर यांनी कामगारांना मिळणाऱ्या सरकारी योजनांची संपूर्ण माहिती दिली. कामगारांना कोण कोणता निधी मिळतो. त्यासाठी कामगार कार्ड किती महत्त्वाचे आहे. याची संपूर्ण माहिती देऊन कामगारांनी त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.
अल्ट्राटेकचे गणपती मुंबारे, सोनिया अनगोळकर यांनी अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीकडून बांधकाम कामगार, कंत्राटदार आणि अभियंते यांना दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. रोटरीचे जिल्हा प्रांतपाल अशोक नाईक यांनी या संघटनेने सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.व जो घटक मागासलेला आहे त्यासाठी काम करण्याची जिद्द या संघटनेची असून त्याला आपल्या शुभेच्छा दिल्या. सरकारी कंत्राटदार विजयराव धामणेकर यांनीही संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या मेळाव्यामध्ये समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर , निवृत पीडीओ दुर्गाप्पा ताशिलदार , येळ्ळूरचे सुपुत्र चंदन कुमार खेमणाकर या युवकाला नौदलात लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली त्याबद्दल या सर्वांचाच सत्कार करण्यात आला.सरकारी कंत्राटदार विजयराव धामणेकर व अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने कामगारांना भेटवस्तू वाटप करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. सी.एम गोरल यांनी करून दिली. सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक अनिल हुंदरे, डी.जी पाटील यांनी केले. तर दत्ता उघाडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज सारथी सेवा संघाचे गोविंद कालसेकर, शिवाजी सायनेकर, प्रकाश अष्टेकर, मनोहर गोरल, बी एन मजुकर, डॉ. तानाजी पावले, यल्लुपा पाटील ,हणमंत कुगजी, सुरज गोरल, दुद्दापा बागेवाडी, राजू पावले, बळीराम देसुरकर, रमेश धामणेकर, बबन कानशिडे, परशराम बिजगरकर, संजय गोरल, शंकर टक्केकर, प्रकाश पाटील, कृष्णा बिजगरकर, परशराम कणबरकर, परशराम धामणेकर, सतीश देसुरकर, रघुनाथ मुरकुटे, गंगाधर पाटील, संजय मजुकर,सतीश पाटील, सुभाष मजूकर, परशुराम निंगाप्पा धामणेकर, मोहन पाटील, यांच्यासह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.