मुतगा गावातील भाजीपाला बाजाराचे पुनर्नियोजन; अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुतगा गावामध्ये सन 2003 पासून सुरू असलेला भाजीपाला बाजार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तारला होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर हा बाजार भरत गेल्याने मुख्य रस्त्यावर भाजीपाला व्यापारी बसू लागले होते. यामुळे वाहतूक कोंडीसह अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीने संयुक्तपणे महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस कमिशनर भूषण बोरसे, सीपीआय आय.आर. पट्टणशेट्टी, ग्रामपंचायत पीडीएफ बसवंत कडे मनी, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष उमेश पुरी, पिंटू यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर भाजीपाला बाजार न भरवता त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दररोज भरणारा रविवारचा बाजार गावातील हनुमान मंदिर समोर, चव्हाट गल्ली, चावडी गल्ली व मारुती गल्ली परिसरात भरवण्यात येणार आहे.
यापुढे भाजीपाला बाजार केवळ प्रशासनाने निश्चित केलेल्या या नियोजित जागेमध्येच भरणार असल्याची सूचना देण्यात आली असून नागरिक व व्यापाऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


मुतग्यातील भाजीपाला बाजाराचे स्थलांतर; अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णायक निर्णय
Related Posts
मुलगी झाल्याचा राग? पित्यानेच घेतला निष्पाप बालिकेचा जीव
Spread the loveबेळगाव जिल्ह्यातील काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भूतरामट्टी गावात अवघ्या १४ दिवसांच्या नवजात बालिकेची विष पाजून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र…
श्रींगारी कॉलनीतील रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार*
Spread the love*श्रींगारी कॉलनीतील रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शहापूर उपनगर शिवशक्ती मिलन वीर संगोळी रायण्णा आणि केअर अँड क्युअर दवाखाना यांच्यावतीने मोफत आरोग्य…
