विश्वकर्मा सेवा संघातर्फे बेळगावात ‘विश्वकर्मा शिल्पी वस्तू प्रदर्शन’; विद्यार्थी व लघुउद्योगांना प्रोत्साह
बेळगाव :
विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने समाजातील शालेय विद्यार्थी व लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विश्वकर्मा शिल्पी वस्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विश्वकर्मा समाजातील विद्यार्थ्यांनी तसेच लघुउद्योगांनी तयार केलेल्या विविध शिल्पकला व हस्तकला वस्तू पाहायला मिळणार आहेत.
हे प्रदर्शन रविवार, दि. 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चेंबर ऑफ कॉमर्स, उद्यमबाग, बेळगाव येथे भरवण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व लघुउद्योगांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
विश्वकर्मा सेवा संघातर्फे बेळगावात ‘विश्वकर्मा शिल्पी वस्तू प्रदर्शन’; विद्यार्थी व लघुउद्योगांना प्रोत्साह
