खानापूर:
थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजू नागरिकांना दिलासा देण्यासाठी खानापूर व परिसरात काल सायंकाळी ब्लँकेट वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नेतृत्व लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन विकास कल्याणी यांनी केले. यावेळी लायन अजित पाटील, लायन जुनीद तोपिनकट्टी, लायन प्रकाश बेटगौड, वीरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गरजू, निराधार व रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना ब्लँकेटचे वितरण करून मानवतेचा व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. लायन्स क्लबच्या या उपक्रमाचे नागरिकांनी विशेष कौतुक केले.
