Spread the love

गुंफण साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी गुंफण साहित्य अकॅदमी व शिवस्वराज्य जनकल्याण संघटना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक
गुंफण साहित्य अकॅदमी व शिवस्वराज जनकल्याण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने, येत्या 22 डिसेंबर रोजी खानापूर येथे गुंफण मराठी साहित्य संमेलन होणार
खानापुरात घुमणार मराठीचा डंका: गुंफण साहित्य संमेलनाचे होणार आयोजन

खानापूर : खानापूर तालुका म्हणजे मराठी समाजाचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी नेहमीच मराठी उमेदवाराच निवडून आला आहे. सत्ता पालट झाली तरी, मराठ्यांचा दरारा कायम आहे . खानापुरात नुकताच गुंफण साहित्य संमेलनाची साठी बैठक संपन्न झाली.
खानापूर येथे गुंफण साहित्य अकादमी शिवस्वराज जनकल्याण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने,मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गुंफण साहित्य अकादमी ही सीमा भागातल्या तसेच महाराष्ट्र कर्नाटक गोवा या ठिकाणी साहित्य संमेलन आयोजित करते. आज गुंफांचेही आता पाचवे साहित्य संमेलन होत आहे. अनेक वर्षाची मराठी अभिलाषा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही होती ती आता पूर्ण झाली आहे. त्या निमित्ताने खानापूर आणि परिसरातील मराठी भाषिकांसाठी खानापूर येथे प्रथमच साहित्य संमेलन होत आहे.
गुंफण अकॅदमी चे अध्यक्ष बसवेश्वर चेणगे, सचिव गजानन चेणगे, ( विश्वस्त) सूर्यकांत बाजारे, सुनील पाटील, सुधीर नावलकर , मुकुंद पाटील, निरंजन सरदेसाई ,गुणवंत पाटील, शिवस्वराज्य संघटना खानापूर कार्यकारी मंडळ निरंजन सरदेसाई, अध्यक्ष रमेश धबाले, उपाध्यक्ष रणजीत पाटील, सभासद सुनील पाटील, सुधीर नावलकर, मिलिंद देसाई,संदेश कोडचवाडकर, प्रभू कदम, नागेश भोसले, विनोद पाटील, संतोष गुरव संमेलन पार पडण्यासाठी सहकार्य करणार आहेत.