बेकायदेशीररित्या हुबळी येथे नेण्यात येत असलेली तब्बल 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांची रोकड जप्त,
:बेळगाव प्रति… महाराष्ट्रातील सांगली येथून अशोक लेलँड दोस्त या मालवाहू वाहनाच्या केबिनमध्ये दडवून बेकायदेशीररित्या हुबळी येथे नेण्यात येत असलेली तब्बल 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांची रोकड बेळगाव शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (सीसीबी) जप्त केल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
सचिन मेनकुदळे (रा. सांगली, महाराष्ट्र) आणि मारुती मारगुडे (रा. सांगली, महाराष्ट्र) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघाजणांची नावे आहेत. बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग आणि दोन्ही पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदिश्वर कुंबार आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे काल शुक्रवारी सायंकाळी सांगली येथून हुबळीकडे निघालेला एक अशोक लेलँड दोस्त हे मालवाहू वाहन अडविले.
त्यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्याच्या केबिनमध्ये बनवण्यात आलेल्या चोर कप्प्यात 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांची रोख रक्कम सापडली.
बेकायदेशीररित्या हुबळी येथे नेण्यात येत असलेली तब्बल 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांची रोकड जप्त,
Related Posts
शहापूर गणेशोत्सव मंडळांची बैठक २७ जुलै रोजी — सुरळीत उत्सवासाठी शिस्त व सुरक्षा नियोजनावर भर
Spread the loveशहापूर गणेशोत्सव मंडळांची बैठक २७ जुलै रोजी — सुरळीत उत्सवासाठी शिस्त व सुरक्षा नियोजनावर भर बेळगाव (शहापूर) – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाच्या शहापूर विभागातील सार्वजनिक…
किणये येथे भीषण अपघात – कॅन्टर क्लीनरचा जागीच मृत्यू, चालक जखमी
Spread the love किणये येथे भीषण अपघात – कॅन्टर क्लीनरचा जागीच मृत्यू, चालक जखमी बेळगाव – गोव्याला भाजीपाला वाहतूक करणाऱ्या कॅन्टरने रस्त्याच्या कडेला निष्काळजीपणे उभ्या केलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने…