Spread the love

रविवार दिनांक 11 रोजी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तालुक्याच्या खराब रस्त्या संदर्भात आंदोलन छेडणार                                                                    बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव वेंगुर्ला व तालुक्यातील अन्य खराब रस्त्याच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 11 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता उचगाव जवळील मधुरा हॉटेल जवळ हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी या आंदोलनामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, तसेच मराठी भाषिकांनी व या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर व चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.