Spread the love

*राजहंसगड किल्ला प्रतिकृती केलेल्या गोकुळ नगर मधील* *मुलामुलींचे कौतुक

गुडशेड रोड गोकुळ नगर येथील लहान मुलामुलींनी अथक परिश्रम घेत बेळगाव येथील अवघ्या 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या राजहंस गड किल्लाची सुंदर अशी प्रतिकृती तयार करून या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले आहे, यामुळे या भागातील अनेकांनी या प्रतिकृतीची प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची वाहवा केली जात आहे. राजहंसगड किल्ला पाहण्यासाठी बाहेरील देशातील नागरिक भेट देत आहेत अशा ह्या सौंदर्यमय सनसेट पॉईंट पाहण्यासाठी रविवार व  सुट्टीच्या दिवसी राजहंस गडावर सायंकाळी अनेक जण भेट देऊन.हा किल्ला पाहून आनंद लुटत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते अशाच किल्ल्याची निर्मिती केलेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करावे या  उद्देशाने  बेळगाव रोलर स्केटिंग अकॅदमी तर्फे आकर्षक मेडल देऊन सुर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले .
*सत्कार करण्यात आलेली नावे*
केदार बिर्जे,वर्धन वेरणेकर, सिध्दी जाधव, अमित पाटील, आर्या जाधव,दर्शन वाडेकर, द्रुव शिंदे,दिनेश वाडेकरअशी असून
यावेळी अविनाश बिर्जे, सागर जाधव, गोकुळ नगर येथील महिला व नागरिक उपस्थित होते