Spread the love

 श्री नामदेव शिंपी समाज बेळगांव तीन सदस्यांची राज्य कमीटीवर निवड झाली आहे. त्याबद्ल त्यांचे कौतूक केले जात आहे. येथील श्री महेश प्रकाश खटावकर यांची कर्नाटक राज्य श्री नामदेव शिंपी समाज युवा घटक बंगळूर,च्या संचालकपदी निवड झाली आहे. तसेच श्री नामदेव शिंपी समाज बेळगाव, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी अशोक हावळ यांची कर्नाटक राज्य श्री नामदेव शिंपी समाज महिला घटक बंगळूरच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच सौ. भारती कृष्णा रेणके यांची श्री नामदेव शिंपी समाज महिला घटक बंगळूरच्या संचालीकपदी निवड झाली आहे. त्यांचे कौतूक केले जात आहे.