बेळगाव :
सौ. व श्री. लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठानच्या वतीने पहिलीच्या वर्गासाठी बॅग वितरणाचा कार्यक्रम
बेळगाव : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने नेहमी समाजहितासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर व त्यांचे बंधू श्री. चंद्रकांत कोंडुसकर यांनी लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठानच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दप्तर (स्कूल बॅग)चे वाटप गव्हर्मेंट मराठी पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा मच्छे येथे दिनांक ५ जुलै रोजी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्री. कृष्णा अनगोळकर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. के. बेळगावकर यांनी केले. शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष श्री. सुधीर हावळ यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाला उद्देशून श्री. सागर कणबरकर, श्री. दत्ता जाधव व श्री. चंद्रकांत कोंडुसकर यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना श्री. चंद्रकांत कोंडुसकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दप्तर (स्कूल बॅग)चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला एसडीएमसी उपाध्यक्ष सौ. संगीता लाड, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश करेन्नावर, श्री. केदारी करडी, श्री. अमोल लाड, श्री. गजानन छपरे, श्री. जतीन गुंडोळकर, श्री. उमेश पाटील, श्री. किरण हुद्दार, श्री. शेखर तळवार, श्री. दीपक सनदी, श्री. विनायक डेळेकर, तसेच एसडीएमसी सदस्य श्री. मोहन वसुलकर, श्री. मनोहर कणबर्गी, श्री. सोमनाथ पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी. व्ही. शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. रेश्मा मोदी यांनी मांडले.