Spread the love

बेळगाव:

बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी आठ वाजता बारामती येथे गोविंद बाग या श्री शरद पवार साहेब यांच्या निवास स्थानी श्री श्री शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आणि याप्रसंगी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न दावा लवकरात लवकर सुनावणीस यावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले यासंदर्भात आपण काय करता येते ते पाहतो असे त्याने समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले गेल्या काळातील सीमा प्रश्नासंदर्भात घडलेल्या घडामोडींची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांकडून घेतली समितीच्या शिष्टमंडळात श्रीमान प्रकाश मरगाळे श्रीमान सुनील आनंदाचे श्री विनोद आंबेवाडीकर श्री पांडू पट्टना श्री मारुती मरगानाचे श्री महादेव मंगनाकर श्री श्री लक्ष्मण मोहिते आणि विनायक मरगाळे यांचा समावेश होता बेळगावचे सुप्रसिद्ध समाज कार्यकर्ते सहकार महर्षी कैलासवासी अर्जुन राव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला दिनांक 2 सप्टेंबर रोजी श्री शरद पवार साहेब बेळगाव ला येणार आहेत याबाबतही कार्यकर्त्यानी श्री शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा केली