Spread the love

गृहलक्ष्मी योजनेच्या निधीतून अंत्यसंस्कार साठी मदत. सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव पाटील यांनी गेल्या दोन महिन्यापासून आपल्याला मिळत असलेल्या गृहलक्ष्मी या योजनेची रक्कम मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याकरिता वापर केली. काल सायंकाळी माधुरी जाधव यांना बातमी आली की गरीब कुटुंबीयातील युवकाचा मृत्यू झाला आहे आणि त्याचा अंत्यसंस्कार करण्याकरिता कुटुंबीयांकडे पैसे नाही आहेत. असे समजताच गृहलक्ष्मी या योजनेचा लाभ घेण्याआधीच माधुरी जाधव यांनी निर्धार केला होता की गृहलक्ष्मी या योजनेतून मिळालेला निधी सामाजिक कार्याकरिता वापरला जाईल. त्यानुसार आज हा निधी अंत्यसंस्कार करण्याकरिता कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. माधुरी जाधव यांनी गृहलक्ष्मी या योजनेचा लाभ खूप स्त्रियांना त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार झाला आहे. त्यातून बरेच चांगले कार्य होत आहेत ही योजना चालू केल्याबद्दल माधुरी जाधव यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या सर, महिला बालकल्याण विकास मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर मॅडम, पालकमंत्री श्री सतीश अण्णा जारकीहोळी सर यांचे धन्यवाद मानले..