Spread the love

साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया ते छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी राजहंसगड किल्लात विदेशी पर्यटकांचे  आगमन*

1) बेळगाव तालुक्यातील एक पर्यटकांचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या राजहंसगड किल्ल्यावरती आज शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी विदेशी ऑस्ट्रेलियन पर्यटकांचे आगमन पाहायला मिळाले.

2)साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया येथील जवळपास 25 ते 30 पर्यटकांनी राजहंसगड किल्ल्यावरती भेट दिली.

3)गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिर व  छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर जाताना  विदेशी ऑस्ट्रेलियन पर्यटकांनी पायातील बूट चप्पल काढून मोठ्या अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले.

4)राजहंसगडावरील तैनात असलेल्या टुरिझम डिपार्टमेंटच्या पोलिसांकडून पर्यटकांना चांगले सहकार्य मिळाले.

5)गडावरील पुरातन वास्तू, दगडी बांधकाम, बाहेर पडण्याचा चोर दरवाजा, तसेच जगातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, किल्ल्याचे सुशोभीकरण, व स्वच्छता पाहून हे विदेशी पर्यटक भारावून गेले.

6)जवळपास तीन तास या विदेशी पर्यटकांनी गडावरती पर्यटनाचा आनंद लुटला.

7)रोज या ठिकाणी देशी व विदेशी शेकडो पर्यटक गडावरती भेट देत असतात.

8)पर्यटकांची उपस्थिती पाहता या ठिकाणी पार्किंग, वाशरूम सह इतर लहान मोठ्या गैरसोयी दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे.